Wednesday, May 17, 2023

आंबा शेवयाची खीर


 

आज आपण आंबा शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत.
 

साहित्य :- 

  • शेवया १ कप 
  • तूप २ चमचे 
  • गरम दुध २ कप 
  • साखर १/२ कप 
  • मिल्क पावडर ४ चमचे 
  • काजू, बदाम, बेदाणे 
  • आंब्याचा पल्प १ कप 
कृती :- 

  • तूप गरम करा. 
  • तुपात शेवया किंचित लाल होईपर्यंत परतवा. 
  • शेवया काढून बाजूला ठेवा. 
  • त्याच तुपात काजू, बेदाणे, परतून घ्या. 
  • दुध गरम करून त्यात शेवया टाका.
     
  • साखर टाका. 
  • मिल्क पावडर टाका व ढवळत रहा. 
  • काजू बेदाणे टाका. 
  • खीर शिजवल्यावर थंड करा. 
  • नंतर त्यात मँगो पल्प टाकून मिक्स करा. 
  • खीर थंडगार करून सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment