Saturday, May 13, 2023

गाजर भात


 


आज आपण गाजरापासून भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. 

साहित्य :- 

  • १ वाटी शिजवलेला भात 
  • १ किसलेले गाजर 
  • ४ मिरच्यांचे तुकडे 
  • कोथिंबीर 
  • मीठ 
  • तेल 
  • जिरे 
  • चवीपुरती साखर
     
कृती :- 

  • प्रथम प्यान मध्ये तेल गरम करून त्यात जिरे घालावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे घालावेत. त्यात किसलेले गाजर घालून चांगले परतावे. 
  • गाजर थोडे शिजत आले की त्यात शिजवलेला भात घालावा. 
  • मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर त्यात चवीपुरते मीठ, साखर घालून सर्व एकत्र करावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. 

No comments:

Post a Comment