Thursday, May 25, 2023

मटण मोगलाई सालन


 


साहित्य :- 

  • अर्धा किलो मटण 
  • पाव किलो कांदे 
  • ५-६ लाल मिरच्या 
  • २ चमचे धणे 
  • ५-६ मिरी, ३ वेलची 
  • १ दालचिनी, १ इंच आले 
  • ७-८ लसूण पाकळ्या 
  • अर्धा चमचा हळद 
  • तूप,मीठ 
  • थोडे केशर, ५-६ बदाम 
कृती :- 

  • मटणाचे तुकडे करून धुवून घ्या. कांदे पातळ चिरून घ्या. मटणाला मीठ, हळद, धणेपूड चोळून घ्या. 
  • तूप तापवून त्यात मटण घालून मोठ्या आचेवर परतत रहा. मटण तांबूस झाले की, त्यात ३ कप उकळते पाणी घालून घट्ट झाकण लावून मटण मऊ शिजवा. 
  • तुपात कांदा परतून बदामी करून घ्या. 
  • मटण शिजले की त्यात, कांदा घाला. वेलची, दालचिनी व ठेचलेली मिरी घाला.
  • जरूर वाटल्यास पाण्याचा शिपका मारून परतत रहा. थोडावेळ परतवून त्यात २ टीस्पून गरम केलेले तूप सोडा. 
  • बदाम दुधात वाटून घ्या. केशर थोड्या दुधात घोळून घ्या. मटणावर दोन्ही घालून एकत्र करून एक वाफ काढा. 
  • हे मटणाचे सालन पराठ्याबरोबर सर्व्ह करा.  

No comments:

Post a Comment