साहित्य :
- २५० ग्रॅॅम कोथिंबीर
- थोडासा पुदिना
- १ कांदा
- ३-४ पाकळी लसूण
- ३ हिरवी मिरची
- १ तुकडा आले
- १ छोटीशी चिंच
- थड गूळ
- १ चमचा शेंगदाणा
- मीठ चवीप्रमाणे
कृती :
- कोथिंबीर व पुदिना निवडून, धुवून घ्या.
- कांदा, लसूण व आले सोलून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
- शेंगदाणे भाजून सोलून घ्या.
- सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये चटणी पिसून घ्या.
- अशा प्रकारे कोथिंबीर चटणी तयार होईल.
No comments:
Post a Comment