Thursday, May 18, 2023

काकडीची लस्सी


 


काकडीची लस्सी बनवण्यासाठी साहित्य :- 

  • ५० ग्रॅम दही 
  • १ काकडी 
  • १/२ कप पुदिना ( बारीक चिरलेला ) 
  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या 
  • १ चमचा आल्याचा कीस 
  • चवीपुरते मीठ 
  • १ मोठा चमचा साखर 
  • बर्फ 
कृती :-
 

  • काकडी सोलून त्याचा कीस करून घ्यावा. 
  • नंतर ब्लँँडरमध्ये दही, आलं, पुदिना, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, किसलेली काकडी टाकून चांगले एकजीव करावे. 
  • बर्फ टाकून परत एकदा फिरवावे. लस्सी तयार आहे. 
  • या लस्सीला ग्लासमध्ये घालून वरून पुदिनाच्या पानांनी सजवावे. 
  • ही स्वादिष्ट लस्सी सर्वांनाच खूप पसंत पडेल. 

No comments:

Post a Comment