साहित्य :
- १०० ग्रॅॅम रवा
- १०० ग्रॅॅम मिल्क पावडर
- १०० ग्रॅॅम साखर
- २-३ टेबलस्पून साजूक तूप
- १ चमचा वेलची पावडर
- २ चमचे काजू पावडर
- २ चमचे बदाम पावडर
- यलो कलर
- १ चमचा केसर सिरप
- १ चमचा पिस्ता काप
कृती :
- कढईत रवा कोरडाच भाजून घ्या नंतर त्यात तूप टाकून रवा भाजा
- तुपात रवा गोल्डन होईपर्यंत भाजा.
- गॅॅस बंद करून भाजलेल्या रव्यात साखर मिल्क पावडर काजू बदाम पावडर वेलची पावडर मिक्स करा व रव्याच्या ३ पट कोमट पाणी टाकून सर्व मिश्रण ढवळुन मिक्स करा
- सर्व गुठळ्या मोडून काढा.
- गॅॅस चालू करा कढईतले बॅॅटर सतत ढवळत रहा थोडा घट्ट झाल्यावर यलो कलर केसर सिरप टाकून मिक्स करा व मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.
- घट्ट झालेला गोळा तूप लावलेल्या ट्रेमध्ये थापून घ्या वरून पिस्ताचे काप लावून थापा व ट्रे १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
- १५ मिनिटा नंतर ट्रे फ्रीजमधून काढून वड्या पाडा.
- अशा प्रकारे खुसखुशीत रवा बर्फी तयार होईल.
No comments:
Post a Comment