Wednesday, May 17, 2023

रवा-खोबरा वडी


 



रवा-खोबरा वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • रवा- २ कप 
  • नारळ ( किसलेले )- २ कप 
  • मावा - ५० ग्रॅम 
  • वेलची पूड- २ चमचे 
  • साखर - १/२ कप 
  • पाणी- १/२ कप ( पाक बनवण्यासाठी ) 
  • बदाम, पिस्ता, काजू - आवश्यकतेनुसार 
  • केसर - (पर्यायी) एक चिमुटभर 
  • तूप- आवश्यकतेनुसार ( रवा भाजणे आणि प्लेटवर पसरवणे ) 
कृती :- 

  • कढई गॅसवर ठेवा. तुपात रवा भाजून घ्या. 
  • मावा, वेलची पावडर, बदाम, पिस्ता, काजू तुकडे एकत्र मिक्स करून घ्या. 
  • आता साखरेचा पाक तयार करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. नंतर साखर घाला आणि सतत हलवत रहा. मिश्रण चिकट झाले तर वेलची पावडर घाला आणि सतत हलवत रहा. नंतर केसर घाला. ढवळत राहा. गॅस बंद करा.
     
  • नंतर वरील मिश्रणात भाजलेला रवा, किसलेले नारळ, मावा मिश्रण घाला. चांगले मिक्स करा. 
  • एका प्लेटवर तूप पसरवा. त्यावर वरील मिश्रण पसरवा. समान रीतीने पसरवा. 
  • मिश्रण थंड होऊ द्या. चाकूने तुकडे करा. 
  • रवा-खोबरा वडी तयार.  

No comments:

Post a Comment