Tuesday, May 2, 2023

रव्याचे कुरकुरीत वडे





 
साहित्य : 

  • १ वाटी रवा 
  • १/२ वाटी दही 
  • १ बारीक चिरलेला कांदा 
  • १ बारीक कापलेली हिरवी मिरची 
  • १/२ चमचा जिरे 
  • १/४ चमचा  सोडा 
  • २-३ कढीपत्ता 
  • कोथिंबीर
  • बारीक चिरलेले आले 
  • मीठ चवीनुसार 
  • तेल 


कृती : 

  • एका भांड्यात रवा घ्या, नंतर अर्धी वाटी पाणी घालून ते मिक्स करून घ्या. 
  • मिश्रण जास्त प्रमाणात बनवलं नाही आणि झाकून अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवा 
  • अर्धा तास रवा छान भिजतो आणि रवा भिजल्यावर चमच्याने मिक्स करावे. 
  • नंतर रव्याच्या मिश्रणात सोडा, चवीनुसार मीठ, जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता  सर्व सामग्री मिक्स करावे. 
  • तेल तापवण्यासाठी ठेवा 
  • नंतर हाताला तेल लावा व रव्याचे मिश्रण हातावर घेऊन त्याचा वडा बनवा व मधोमध बोटाने होल पाडून मेदू वड्यासारखं बनवा. 
  • तेल गरम करण्यासाठी ठेवावे, तेल गरम झाल्यावर तळण्यासाठी तेलात वडे सोडावे, दोन्ही बाजू लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. 
  • अशा प्रकारे कुरकुरीत स्वादिष्ट रव्याचे वडे तयार होतील.  

No comments:

Post a Comment