साहित्य :-
१) ताजे दही १ लिटर
२) एक मध्यम हापूस आंबा
३) व्हॅॅनिला आईस्क्रिम
४) साखर.
१) दही छान फेटून घ्या.
२) आंब्याचा रस काढून दह्यात घालून एक जीव पुन्हा फेटून घ्या.
३) साखर आवश्यक तेवढी आपल्याला जितके गोड आवडते तसे.
४) एक अर्धा तास फ्रीज मध्ये थंड करायला ठेवा.
५) गार गार ग्लास मध्ये ओतून वर छान आईस्क्रिम गोळा टाका (हवा तेवढा).
अशा प्रकारे तयार आहे उन्हाळा स्पेशल आंबा लस्सी विथ व्हॅॅनिला आईस्क्रिम.
No comments:
Post a Comment