साहित्य :
- १ चमचा तेल १ कप कढीपत्ता पाने
- १/४ कप सुक खोबर
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा गूळ किंवा साखर
- मीठ
कृती :
- तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने परतावीत. आच मंद ठेवावी. कढीपत्ता कुरकुरीत होईस्तोवर परतावे.
- आता भाजलेले खोबरे घालून थोडावेळ मंद आचेवर परतावे. आच बंद करावी.
- मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यात लाल तिखट, गूळ / साखर आणि थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे.
- अशा प्रकारे कढीपत्ता चटणी तयार होईल.
No comments:
Post a Comment