आज आपण अंडा चाट कसा बनवतात ते जाणून घेऊ :-
साहित्य :-
- ३ उकडलेली अंडी
- १ चमचा टोमॅॅॅटो केचप
- १ चमचा टोमॅटो चिली सॉस
- ३ चमचा चिंचेचा रस
- १ चमचा लिंबूचा रस
- १ चमचा भाजलेले जिरे
- १-२ हिरव्या मिरच्या
- स्प्रिंग अनियन
- चवीप्रमाणे मीठ
- २ चमचा कोथिंबीरचे काप
- एका भांड्यात टोमॅॅॅटो केचप, टोमॅॅॅटो चिली सॉस, चिंचेचा रस, लिंबूचा रस, भाजलेले जिरे, हिरवी मिरची आणि मीठ मिसळा.
- एका प्लेटमध्ये उकडलेली अंडी घेऊन त्याचे चार भाग करून घ्या.
- या कापलेल्या तुकड्यावर तयार केलेले मिश्रण टाका.
- वरून कापलेले स्प्रिंग अनियन, कोथिंबीर, गरम मसाला टाका आणि गार्निश करून सर्व्ह करा.
- चटपटीत अंडा चाट तयार आहे....

No comments:
Post a Comment