Thursday, May 4, 2023

सोप्पा मावा केक


 

सोप्पा मावा केक बनवण्यासाठी पुढील साहित्य आणि कृती आहे.
 

साहित्य :- 

  • १/२ कप बटर किंवा तूप 
  • १ कप पिठी साखर 
  • १/२ कप मैदा 
  • १ चमचा बेकिंग पावडर 
  • १/४ चमचा खायचा सोडा 
  • १/४ कप दही 
  • ३/४ कप दुध 
  • १ कप खवा 
कृती :-
 

  • सगळ्यात पहिल्यांदा बटर / तूप घेऊन त्यात पिठीसाखर घाला आणि खूप छान फेटून घ्या. 
  • मस्त क्रिमी झालं की त्यात दही घालून परत फेटून घ्या. 
  • मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र चालून घ्या, यामुळे केक हलका व्हायला मदत होते. 
  • आता हे सगळ साहित्य तूप साखरेच्या मिश्रणात घालून कट फोल्ड प्रकारे मिक्स करून घ्या. 
  • लागेल तसं थोडं थोड्व दुध घालून मिश्रण तयार करा. 
  • साधारण इडली पिठासारखी कंसिस्टंंसी यायला हवी. 
  • आता ओवन १८० डिग्री वर १० मिनिट प्री-हिट करून घ्या. 
  • तयार बॅटर केक मोल्ड मध्ये घालून साधारण ५० मिनिटे बेक करून घ्या. 

No comments:

Post a Comment