Tuesday, May 16, 2023

पनीर बर्गर




 
साहित्य :- 

  • ८ बर्गरचे पाव 
  • ८ चीज स्लाईस 
  • ४०० ग्राम पनीर 
  • १ वाटी मैदा 
  • २ बटाटे 
  • १ चमचा आले 
  • ३-४ लसूण पाकळ्या 
  • ३-४ हिरव्या मिरच्या 
  • १ चमचा मिरे पूड 
  • मुठभर कोथिंबीर 
  • १ कांदा 
  • १ टोमॅॅटो 
  • १ वाटी लेट्युस 
  • मीठ 
  • तेल. 


कृती :- 

  • पनीरचे चौकोनी तुकडे करून तव्यावर थोडे तेल घालून गुलाबी रंगावर भाजून घेणे. 
  • कुकरमध्ये बटाटे उकडून घेणे. 
  • आले, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. 
  • परातीत कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरचीचे वाटण, मिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ एकत्र करणे. 
  • त्यात पनीरचे तुकडे घालणे व मिश्रणाचे टिक्की बनवणे. 
  • मैदा आणि पाणी एकत्र करून पातळ पीठ बनवणे. ह्या पिठात टिक्की बुडवून तेलात मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत तळणे. 
  • बर्गरच्या पावावर टोमॅॅटो, कांदा आणि चीज यांचे तूकडे रचणे. त्यावर टिक्की आणि लेट्युस घालून बर्गर बंद करणे व खायला देणे.   
 

No comments:

Post a Comment