आज आपण मुगाचंं बिरडंं कसे बनवायचे ते पाहूया.
साहित्य :-
- वाटीभर मुग
- दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून
- नारळाचे दुध किंवा ओल खोबर
- २ चमचे मालवणी मसाला
- २-३ कोकम
- एक मोठा लाल कांदा बारीक चिरून
- हळद, हिरवी मिरची, जिर, तेल, मीठ
- ७-८ काड्या कोथिंबीर
- मुग भिजवून, मोड काढून, सालं काढून तयार करून घ्यावेत.
- मुगामध्ये थोडी हळद, ठेचलेली लसूण, मीठ अन मालवणी मसाला नीट कालवून घ्यावा.
- थोड्या तेलावर जिर, हिरवी मिरची घालून मग कांदा परतून घ्यावा.
- कांदा मऊ झाला की मुग घालावे, थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवावे.
- शिजत आले की नारळाचे दुध घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
No comments:
Post a Comment