Sunday, May 28, 2023

मटारची आमटी


 



साहित्य :- 

  • एक वाटी सोललेले मटारचे दाणे 
  • एक वाटी बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी 
  • अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅॅटो 
  • कडुलिंबाची दहा-बारा पाने बारीक चिरून 
  • चिमुटभर लवंग-दालचिनी पूड 
  • अर्धा चमचा धने- जिरे पूड 
  • लाल तिखट- हळद 
  • चिंचेचा कोळ, गुळ 
  • फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल 
  • मोहरी, हिंग 
  • चिमुटभर मेथी पूड 
  • ओलंं खोबरे, कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 
कृती :- 

  • मटार वाफवून घ्यावे. 
  • तेलाची फोडणी करून त्यात मेथी पूड, कडुलिंब, बटाटे घालून परतून घ्यावे.
  • टोमाटो घालून परतावं. त्यात मटारचे दाणे, दोन वाट्या पाणी, मीठ, लाल तिखट, गुळ, चिंचेचा कोळ आणि मसाला घालून उकळू द्या.
  • खोबरे-कोथिंबीर घालावी. ( यात कुठलीही डाळ नसली तरी आमटी चांगली लागते. ) 

No comments:

Post a Comment