Friday, May 5, 2023

गोल कांदा भजी


 

साहित्य : 

  • १ बारीक चिरलेला कांदा 
  • १/४ वाटी कोथिंबीर 
  • ३-४ मिरच्या 
  • १/४ चमचे हळद 
  • १/२ चमचे जिरे 
  • १/२ चमचे ओवा 
  • चवीनुसार मीठ 
  • १ कप बेसन 
  • चिमुटभर सोडा 
  • तेल 

कृती : 

  • प्रथम एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हळद, मीठ, जीरे, ओवा, आणि चिमुटभर सोडा घ्यावा. 
  • त्यामध्ये बेसन घालून थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावे. फार पातळ पीठ करू नये. नाहीतर भजी गोल होणार नाहीत. 
  • आता एका कढईत तेल चांगले गरम करून त्यामध्ये हाताने किंवा चमच्याने थोडे थोडे मिश्रण सोडावे. 
  • मध्यम आचेवर भजी तळून घ्यावी. 
  • सोनेरी रंगावर भजी तळून घेऊन टिश्यू पेपर वर काढून घ्यावीत. 
  • अशा प्रकारे स्वादिष्ट गोल कांदा भजी तयार होतील. 

No comments:

Post a Comment