साहित्य :
- १ वाटी सोललेल्या लाल भोपळ्याचे तुकडे
- १/२ वाटी किसलेला गूळ
- मिश्रणात मावेल इतकी कणीक
- २ मोठे चमचे तांदळाचे पीठ
- १ चमचा बडीशेप वेलची आणि जायफळ एकत्रित पावडर
- २ चमचा तेल
- तेल
कृती :
- भोपळ्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. एका पातेल्यात भोपळा आणि गूळ एकत्र करून घ्यावेत. कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. त्यामुळे भोपळा पटकन शिजतो आणि व्यवस्थित स्मॅॅश होतो.
- बडीशेप, वेलची आणि जायफळ यांची एकत्र खलबत्त्यात कुटुन तयार करून घ्यावा. त्यामुळे ताजा ताजा स्वाद घाऱ्यांंना छान येतो.
- कुकर थंड झाल्यानंतर भोपळा गुळाचे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. त्यामुळे मिश्रण व्यवस्थित एकजीव होते.
- मिक्सर मधून बारीक केलेली भोपळ्याची पेस्ट, मीठ, तांदळाचे पीठ, खसखस, बडीशेप, वेलदोडा जायफळाची एकत्रित बारीक केलेली पूड, चवीनुसार मीठ, कणिक आणि दोन चमचे तेल टाकून सर्व पीठ घट्ट मळून घ्यावे पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडा तेलाचा हात लावून परत एकदा चांगले मळून त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
- दहा मिनिटांनी मळलेला गोळा परत एकदा चांगले मळून त्याचा एक मोठा गोळा घ्यावा. पोळपाटाला तेल लावून त्याची चपाती लाटून घ्यावी.
- किनार असलेल्या वाटीने पुऱ्या पाडून घ्याव्यात. पीठ घट मळल्याने पुऱ्या छान खुसखुशीत होतात.
- कढईमध्ये आधीच गरम तेल करायला ठेवावे गॅॅस मोठा ठेवून पुऱ्या गरम तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. त्यामुळे त्या चांगल्या फुगतात, कडक होत नाहीत.
- अशा प्रकारे भोपळयाचे घारगे तयार होतील.
.jpg)
No comments:
Post a Comment