आज आपण गाजर आणि कोबीचे सॅॅलेड कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत :-
साहित्य :-
- २ वाट्या बारीक चिरलेली कोबी
- १ वाटी बारीक चिरलेली गाजरे
- १ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिर्चीब
- २ चमचे किसलेला कांदा
- अर्धी वाटी दही
- अर्धी वाटी क्रीम किंवा मेयोनेझ
- १ चमचा साखर
- १ चमचा मीठ
- पाव चमचा मिरेपूड
- भाज्या एकत्र कराव्यात. दही, क्रीम, साखर, मीठ व मिरेपूड घालून वेगळे ढवळावे.
- बाजारी क्रीम नसल्यास घरची साय घोटून घालावी. तेही न जमल्यास दह्याचे प्रमाण दुप्पट करावे. मात्र दही आंबट नसावे.
- पसरत भांड्यात भाज्या घालून त्यावर दही हलकेच ओतावे. अलगद भांडे मिसळावे. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार झाल्यानंतर खावे.
- आवडीनुसार भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणे, काजू किंवा अक्रोडाचा भरड चुरा किंवा भाजके चणे करून घालावे.
No comments:
Post a Comment