Tuesday, May 2, 2023

क्च्च्या फणसाची (कुवरीची) भाजी (पुसभाजी/ ठेचभाजी)




कच्च्या फणसाची (कुवरीची) भाजी बनवण्याचे साहित्य :-
१) फणसाची कुवरी १ (पौष महिन्यात झाडावर जे फणस धरतात ज्यामध्ये नुकते गरेतयार व्हायला लागतात त्यात आठळ्या वैगेरे काहीही तयार नसते असा फणस भाजीसाठी घ्यावा. २) पौष महिन्यातील फणस म्हणून या भाजीला पुसभाजी असदेखील म्हणतात ), ३)  ठेचलेली लसूण ७ ते ८ पाकळ्या, ४) १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, ५) कढीपत्ता ५/६ पाने, ६) पाव चमचा हळद , ७) १ चमचा राई, ८) मालवणी मसाला १ ते दीड चमचा, ९) तेल २ चमचे, १०) मीठ आवडीनुसार, ११) किसलेले ओलं खोबरे ३ ते ४ चमचे.  


कच्चा फणसाची (कुवरीची) भाजी बनवण्याची कृती :- प्रथम फणसाच्या कुरवीचे काटेरी साल व मधला चिवट भाग (त्याला फणसाची पाव म्हणतात) काढून घेणे. त्यानंतर फणसाचे तुकडे करून मीठ व थोडे पाणी टाकून कुकरला ३ शिट्ट्या काढून वाफवून घेणे. कुकर थंड झाल्यावर हे तुकडे खलबत्यात ठेचून बारीक करून घेणे. कढईत टेप तापवून त्यात ठेचलेली लसूण टाकावी लसूण परतून घेतला की त्यात कांदा, राई, कढीपत्ता टाकावा. राई तडतडली की त्यात हळद आणि मालवणी मसाला टाकावा. थोड परतून लगेच ठेचलेला फणस टाकून परतून घ्यावी गरज असल्यास मीठ घालावे व १ वाफ काढून घ्यावी. नंतर भाजी परतून किसलेले ओलं खोबरे टाकावे व परतून घ्यावे. 

      अशा प्रकारे कुवरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे.     

No comments:

Post a Comment