आज आपण कोबीची वडी रेसिपीची साहित्य आणि कृती पाहणार आहोत.
साहित्य :-
- २०० ग्राम कोबी
- १ मोठी जुडी कोथिंबीर
- ६-७ हिरव्या मिरच्या
- १ वाटी डाळीचे पीठ
- २ चमचे मीठ ( चवीनुसार )
- ३ मोठे चमचे तेल
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- पाव चमचा हिंग
- अर्धा चमचा हळद
- तेल
- कोथिंबीर निवडून बारीक चिरावी. कोबी चिरावी व मिरच्या बारीक वाटाव्या.
- तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग, हळद क्रमाने घालून त्यावर कोबी घालावी. ३-४ मिनिटे ढवळावे.
- डाळीच्या पिठात मीठ व पाणी घालून गुळगुळीत मिश्रण कालवावे. कोबीवर हे पीठ ओतावे व मंद आचेवर शिजू द्यावे.
- एका थाळीला किंवा ट्रेला तेलाचा हात फिरवून त्यावर हे पीठ थापावे. तेलाच्या हाताने पृष्ठभाग सारखा करावा.
- गार झाले की, चौकोनी वड्या कापाव्या. तव्यावर बाजूने तेल सोडून परताव्या.
- सॉस, चटणीबरोबर खायला द्याव्यात.

No comments:
Post a Comment