Wednesday, May 3, 2023

काकडीचे थालिपीठ



 
साहित्य : 

  • १ कप काकडीचा कीस 
  • दीड कप उपासाची भाजणी
  • १/४ दाण्याचा कुट
  • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  • २ ते ३ हिरव्या मिरच्यांचा ठेचा 
  • चवीपुरते मीठ 
  • तूप 

कृती : 

  • काकडी सोलून किसावी. किसल्यावर त्यातील पाणी काढून टाकू नये. 
  • काकडीच्या किसात थोडे मीठ टाकावे. नंतर दाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. 
  • काकडीच्या मिश्रणात भिजेल इतकी उपासाची भाजणी घालावी. व्यवस्थित गोळा मळून घ्यावा. 
  • तव्याला तूपाचा हात लावावा. तयार गोळ्याचे २ ते ३ समान भाग करावे. त्यातील १ भाग घेऊन तव्यावर थापावा. 
  • झाकण ठेवून थोडावेळ शिजू द्यावे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी थालिपीठ खरपूस होऊ द्यावे. 
  • थालिपीठ भाजताना कडेने थोडे तूप सोडावे. 
  • दही, लिंबाच्या गोड लोणच्यासोबत काकडीचे थालिपीठ चविष्ट लागते. 
  • अशा प्रकारे काकडीचे स्वादिष्ट थालिपीठ तयार होईल. 

No comments:

Post a Comment