Saturday, May 27, 2023

खजुराची बर्फी


 



साहित्य :- 

  • २०० ग्रॅम बिनबियाचा खजूर 
  • अर्धा नारळ 
  • १ वाटी साखर 
  • अर्धी वाटी दुध 
  • ४-५ वेलदोड्याची पूड 
  • २५ ग्रॅम काजू 
कृती :- 

  • थोड्या काजूचे काप करा व बाजूला ठेवा.
  • उरलेल्या काजूची जाडसर पूड करा.
  • नंतर खजूर, खोबरे, दुध, साखर व काजू-पूड एकत्र करून गॅॅसवर ठेवा.
  • मिश्रण घट्टसर होत आले की वेलदोड्याची पूड घाला.
  • नंतर घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापा.
  • त्यावर काप पसारा. नंतर गार झाल्यावर वड्या पाडा. 

No comments:

Post a Comment