Saturday, May 6, 2023

कोळंबी मसाला


 

आज आपण कोळंबी मसाला कसा बनवायचा ते पाहूया. 

साहित्य :- 

  • दीड वाटी कोळंबी 
  • ४ कांदे 
  • २ टोमॅॅटो, ( २ चमचे आले, लसूण, कोथिंबीर व मिरची पेस्ट ) 
  • अर्धा चमचा हळद 
  • १ चमचा गरम मसाला पावडर 
  • १ चमचा मिरची पूड 
  • हिंग 
  • चार चमचे साय 
  • अर्धी वाटी तेल 
  • मीठ. 

कृती :- 

  • कोळंबी साफ करून तिला मीठ व हळद लावून ठेवावी. कांदा-टोमॅॅॅटो बारीक चिरून घ्यावा. 
  • तेलावर हिंगाची फोडणी करून त्यात हळद, मिरचीपूड, गरम मसाला टाकावा व दोन मिनिटे परतून त्यात कांदा लाल करावा. 
  • साय त्यात मिसळून तेल सुटू लागले की चिरलेले टोमॅॅॅटो व कोळंबी घालून नीट परतावे व मीठ घालून शिजू द्यावे. 
  • वाढताना वर कोशिंबीर घालावी. 


No comments:

Post a Comment