Saturday, May 6, 2023

खजुराची चटणी

 

साहित्य : 

  • ५-६ खजुराच्या बिया 
  • ३ हिरव्या मिरच्या 
  • ४ चमचे कोथिंबीर 
  • २ चिमट्या हिंग 
  • लहान लिंबाएवढी चिंच 
  • अर्धा चमचा मीठ 
  • २ चमचे तेल 
  • पाव चमचा मोहरी 
कृती : 

  • तेल व मोहरीखेरीज सर्व जिन्नस थोडे पाणी घालून एकत्र वाटावे. 
  • पळीत तेल तापवून मोहरी व हिंग घालून फोडणी करावी व चटणीवर ओतावी. 
  • आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून चटणी सरबरीत करावी. 
  • अशा प्रकारे खजुराची चटणी तयार होईल. 

No comments:

Post a Comment