Friday, May 5, 2023

पनीर भुर्जी


 


साहित्य : 

  • १/४  किलो पनीर 
  • २ कांदे बारीक चिरलेले 
  • ६ मिरच्या 
  • १ इंच आलं बारीक किसलेलं
  • १ चमचा तेल 
  • १ चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जीरे 
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर 
  • १ चमचा लिंबूरस 

कृती : 

  • पनीरचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये काढून घ्यावे. 
  • कढई गॅॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झाले की हिंग, मोहरी, जिरे, कांदा, हळद यांची खमंग फोडणी करावी. 
  • व त्यामध्ये मिरची घालावी व छान परतावे कांदा लालसर झाला की त्यामध्ये लिंबू रस, मीठ, साखर आल्याचा कीस घालून छान परतावे व बारीक केलेल्या पनीर त्यामध्ये घालून परतून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी गॅॅस मिडीयम ठेवावा. 
  • दोन ते तीन मिनिटात छान परतले की गॅॅस बंद करावा. त्यावर कोथिंबीर घालावी व गरम गरम चपाती सोबत सर्व्ह करावे. 
  • अशा प्रकारे पनीर भुर्जी तयार होईल. 

No comments:

Post a Comment