Thursday, May 4, 2023

कोबीची भाजी


 

आज आपण रोजच्या वापरातील पदार्थ बनवणार आहोत, तो पदार्थ म्हणजे कोबीची भाजी.
 

साहित्य :- 

  • १ मध्यम आकाराचा कोबी 
  • १ वाटी ताजे वाटाणे किंवा भिजवलेली हरभरा डाळ किंवा एक मध्यम बटाट्याच्या काचऱ्या 
  • ७-८ हिरव्या मिरच्या 
  • ७-८ कडीपत्त्याची पान 
  • मीठ 
  • फोडणीसाठी - १ डाव तेल, मोहरी, हळद, वरून पेरायला भरपूर कोथिंबीर 
कृती :-
 

  • कोबी एकसारखा, बारीक चिरून घ्यावा. 
  • मिरच्या मिरची कटरमधून काढाव्यात अथवा बारीक चिरून घ्याव्यात. 
  • तेलात मोहरीची फोडणी चांगली तडतडली की कडीपत्ता आणि मिरच्या घालाव्यात.
  • लगेचच कोबी आणि वाटाणे / डाळ / बटाटे घालावेत. 
  • भाजी चांगली हलवून घ्यावी. मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालावी. 
  • झाकण न घालता मंद आचेवर भाजी शिजवावी. 
  • खाली लागू नये म्हणून अधून मधून हलवत रहावी. 
  • फार सपक शिजवू नये, थोडा करकरीत राहू द्यावा कोबी. 
  • भाजी शिजली की उरलेली कोथिंबीर वरून घालावी. 

No comments:

Post a Comment