Wednesday, May 17, 2023

ब्रेडचा गुलाब जामून





 
साहित्य :- 

- १०-१२ स्लाईस ब्रेड 

- १/२ वाटी दुध 

- पाऊणे दोन वाट्या साखर 

- १ वाटी दुध 

- वेलची पूड 

- तळण्यासाठी तेल. 




कृती :- 

- ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घ्या. ब्रेड कुस्करा. 

- त्यामध्ये थोडेसे दुध घालून ब्रेड मळून घ्या. 

- नंतर साखर व पाणी एकत्र करून साखर विरघळेपर्यंत उकळी आणा आणि पाक तयार करून घ्या. 

- नंतर मळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे गोळे करून मंद आचेवर तळून घ्या. 

- गरमागरम गोळे पाकात घाला. 

              तयार आहेत ब्रेडचे गुलाब जामून. 

No comments:

Post a Comment