Wednesday, May 3, 2023

शिळ्या भाताचा चिवडा


 

आज आपण शिळ्या भाताचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया.
 

साहित्य :- 

  • शिजवलेला भात
  • तिखट, मीठ 
  • पिठीसाखर 
  • काजू पाकळी 
  • बेदाणे 
  • शेंगदाणे 
  • पंढरपुरी फुटाण्याचे डाळंं
  • कडीपत्त्याची पाने 
  • फोडणीचे साहित्य 
  • तेल 
कृती :-
 

  • रात्रीचा उरलेला भात हाताने मोकळा करून घेऊन वरून तिखट, मीठ, थोडीशी पिठीसाखर चोळून घ्यायची. 
  • उन्हात पूर्ण वाळवून घ्यायचा आणि असा वाळवलेला भात नंतर त्यात उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली लसूण, पंढरपुरी डाळ, शेंगदाणे, काजू, बेदाणे व कडीपत्त्याची पाने यांचासह तळून घ्यायचा इतका अप्रतिम लागतो ना हा चिवडा. 

No comments:

Post a Comment