Friday, May 19, 2023

ब्रेड पिझ्झा कप्स


 


साहित्य :- 

  • ६ गव्हाच्या ब्रेडचे काप 
  • १/४ वाटी चिरलेली हिरवी भोपळा मिरची 
  • १/४ वाटी चिरलेली पिवळी भोपळा मिरची 
  • १/४ वाटी चिरलेला कांदा 
  • १/४ वाटी चिरलेला टोमॅॅटो 
  • १ चिरलेली हिरवी मिरची 
  • अर्धी वाटी पिझ्झा सॉस 
  • १ मोठा चमचा ओरेगॅॅनो 
  • १ लहान चमचा रेड चिली फ्लेक्स 
  • १ लहान चमचा मिरपूड 
  • अर्धी वाटी मोझेरेला चीज 
  • १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल. 


कृती :- 

  • गोलाकार बिस्कीटाच्या कटरने सँँडविच ब्रेडला गोलाकार कापून घ्या. 
  • ओवनला १९० अंश सेल्सियस तापमानावर प्रीहीट करा. मफिनच्या पॅॅनला ऑलिव्हचे तेल लावा आणि हळूहळू ब्रेडला गोलाकार ठेऊन अलगद दाबा. 
  • नंतर ब्रेडला एक पिझ्झा सॉसचा थर लावा आणि चिरलेल्या भाज्या करा. 
  • नंतर ओरेगॅॅनो, चिली फ्लेक्स, मिरपूड आणि किसलेले मोझेरेला चीज पेरा. 
  • आता तयार झालेल्या मफिनच्या पॅॅनला भाजण्यासाठी १०-१५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा किंवा ब्रेड सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजा. 
  • मफीन पॅॅनमधून काळजीपूर्वक ब्रेड कप्स काढा आणि गरमागरम वाढा. 

No comments:

Post a Comment