Wednesday, May 10, 2023

चीजची बिस्किटे


 


आज आपण चीज पासून बिस्किटे कशी बनवायची त्याची रेसिपी आणि कृती जाणून घेणार आहोत. 

साहित्य :- 

  • १०० ग्रॅम मैदा 
  • ५० ग्रॅम लोणी 
  • २५ ग्रॅम चीज 
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर 
  • चिमट्या लाल तिखट ( ऐच्छिक ) 
कृती :- 

  • चीज किसून घ्यावा. लोणी हाताने फेसावे. त्यात चीज व मैदा मिसळावा. 
  • चांगले मिसळले की त्यात बेकिंग पावडर व तिखट घालावे. पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे. 
  • पिठाची पाव इंच जाडीची पोळी लाटावी. लाटण्यापूर्वी थोडा मैदा पोळपाटावर भुरभुरावा. म्हणजे पोळी चिकटणार नाही. 
  • साचा असल्यास त्याचा वापर करावा व लहान बिस्किटे कापावी किंवा सुरीने चौकोनी तुकडे करावे. 
  • तुपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये ही बिस्किटे मांडवी व कमी तापमानावर सुमारे पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये भाजावी.  


No comments:

Post a Comment