साहित्य :-
- २ कप - ५० ग्रॅॅम कुरमुरे
- १ मोठा कांदा - १०० ग्रॅॅम्स बारीक चिरलेला
- १ मध्यम आकाराचा टोमॅॅटो - ८० ग्रॅॅम बारीक चिरलेला
- १ मध्यम आकाराचा बटाटा - ८०ग्रॅॅम उकडून बारीक चौकोनी तुकडे करून
- हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी
- लसणाची लाल चटणी
- चिंच खजुराची गोड चटणी
- चपट्या शेवपुरीच्या पापड्या आणि पाणीपुरीच्या पुऱ्या
- अर्धा कप तिखट गाठी
- अर्धा कप भावनगरी गाठी
- अर्धा कप बारीक नायलॉन शेव
- पाव कप मसाला शेंगदाणे
- पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा चाट मसाला
- पाव चमचा काळे मीठ
- १ चमचा लिंबाचा रस.
- कुरमुरे व्यवस्थित साफ करून मग एका मोठ्या कढईत मंद आचेवर भाजून घ्यावेत. ४-५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. फक्त त्यांचा रंग बदलू देऊ नये.
- एका मोठ्या भांड्यात कुरमुरे, चिरलेला कांदा, टोमॅॅटो, बटाटा आणि लिंबाचा रस घालून एकत्र करावे. मसाला शेंगदाणे व इतर फरसाण सुध्दा घालावे. चाट मसाला, काळे मीठ आणि पापडी व पुऱ्या चुरून घालाव्यात.
- नंतर आवडीनुसार लागेल तेवढ्या चटण्या घालाव्यात ३ चमचे हिरवी चटणी, १ चमचा लाल चटणी आणि ५ चमचे चिंच खजुराची चटणी घालावी. व्यवस्थित एकत्र करून घ्याव्यात.
.jpg)
No comments:
Post a Comment