बरेच लोक ओट्स बद्दल जाणून असतील पण तरीही हा पदार्थ फक्त शहरात आणि ते पण आरोग्य जपणाऱ्या लोक खाताना दिसतात. बऱ्याच लोकांसाठी नवीन आहेच त्यामुळेच हा या ब्लॉग मध्ये आहे.
ओट्स उपमा बनवण्याचे साहित्य :- १) एक छोटी वाटी ओट्स, २) तेल किंवा तूप, ३) जिरे, ४) मोहरी, ५) कांदा, ६) शेंगदाणे लसूण, ७) मिरची पावडर, ८) मसाला आवडीप्रमाणे, ९) गाजर, १०) मटार, ११) सोयावडी, १२) कढीपत्ता उपलब्ध असेल तर.
ओट्स उपमा बनवण्याची कृती :-
तेल किंवा तूप कढईत टाका. थोडे गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता टाका. आता शेंगदाणे आणि कांदा टाकून परतून घ्या. कांदा नीट परतल्यानंतर गाजर, मटार, थोडा वेळ भिजवलेली सोयाबीन वडी हे ऑप्शनल पदार्थ टाकावे. हे उपलब्ध असतील तर पौष्टिकता अजून वाढते. पण यातले काही नसेल तरी मीठ मसाला टाकलेला ओट्स उपमा पण चांगला लागतो. त्यात तिखट म्हणून मिरची पावडर आणि मसाला आपल्या आवडीनुसार टाकावा.
दोन तीन वेळा चमच्याने हलवून त्यानंतर जेवढे ओट्स आणि इतर गोष्टी आहेत त्याच्या दीडपट पाणी टाकावे त्यात ओट्स टाकावे. मीठ चवीनुसार टाकावे. थोडे चमच्याने हलवावे. पाणी व्यवस्थित कमी होऊन ओट्स पाच ते दहा मिनिट शिजतील. थोडा सुपी हवा असेल तर पाणी ठेवले तरी चांगले लागते, किंवा पूर्ण पाणी कमी करावे, नंतर आवडीनुसार तूप टाकू शकता.
अशा प्रकारे आपला ओट्स उपमा तयार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment