आज आपण अननस केक कसा बनवतात त्याची साहित्य आणि कृती जाणून घेऊ :
साहित्य :
- १/२ कप अननसाचे तुकडे वाफवलेले
- २ कप मैदा
- चिमुटभर मीठ
- १/२ चमचा दालचिनी
- जायफळ व लवंग पूड
- २ चमचे मनुका
- १ अंडे फेसून घेतलेले
- वाफवलेल्या अननसाचा सिरप ४ चमचे
- मैदा, मीठ, मसाल्याची पूड एकत्र चालून घ्या. त्यात अननसाचे वाफवलेले तुकडे, बेदाणे घाला.
- सिरप व घुसळलेले अंडे एकत्र करा व त्यावरील मिश्रणात घाला. बेकिंग ट्रेमध्ये हे मिश्रण टेबलस्पूनने घाला.
- गोळ्यांमध्ये अंतर ठेवा. गोळे फार लहान नसावेत. त्यावर थोडी-थोडी साखर पेरा व वीस मिनिट बेक करा.

No comments:
Post a Comment