आज आपण पोळ्यांचा चुरमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
साहित्य:-
- ५-६ पोळ्या ( चपात्या/भाकऱ्या )
- १ कांदा
- तिखट
- मीठ
- हळद
- १ चमचा साखर
- कडीपत्ता
- जिरे
- मोहरी ( फोडणीसाठी )
- पोळ्यांचा बारीक चुरा करावा. त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.
- कांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जिरे, मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.
- कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरून साखर व बारीक चिरून कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवावे व गरमागरम वाढावे.
- पोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामुळे शिल्लक पोळ्या टाकून द्यावा लागत नाही.
- ह्यात तुम्ही शेंगदाणे, शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.

No comments:
Post a Comment