साहित्य :-
१) ३ मोठ्या आकाराचे बटाटे
२) आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल
३) मीठ स्वादानुसार
४) टोमॅॅटो कॅॅचप आणि मेयोनीज (बुडवण्यासाठी).
कृती :-
१) एक स्टीलचा वाडगा घ्या आणि त्यात बटाट्यांना पुरेल इतके पाणी उकळवा.
२) पाणी उकळायला लागले की त्यात बटाटे घाला. गॅॅस बंद करून उकळत्या पाण्यात बटाटे ६ ते ७ मिनिटांसाठी राहू द्या.
३) या कालावधीनंतर, बटाट्यातील पाणी काढून टाका आणि बटाटे पुसून घ्या. एकानंतर एक बटाटे सोला आणि त्याचे लांब काप करा.
४) एक कढई घ्या. त्यात तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल घ्या. त्यात १ मिनिटासाठी बटाट्याचे काप तळा.
५) नंतर आच कमी करा आणि बटाटे शिजेपर्यंत तळा. तळताना त्यांचा रंग अधिक बदलला जाऊ नये.
६) एकदा शिजले की, त्यांना एका ताटात काढा आणि त्यातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर वापरा.
७) वाढण्याअगोदर, बटाट्याचे काप पुन्हा मोठ्या आचेवर कुरकुरीत आणि हलक्या तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा.
८) स्वादानुसार त्यावर मीठ लावा.
इच्छेनुसार टोमॅॅटोचे सॉस, कॅॅचप आणि मेयोनीजबरोबर गरमागरम वाढा.
No comments:
Post a Comment