Thursday, May 4, 2023

पुरी खायला आवडते? मग कधी 'मटकी पुरी' ट्राय केली का?

       
अगदी कमी वेळात तयार होणारी मटकीची पुरी कुरकुरीत, चविष्ट तर आहेच, पण यात शरीरास फायदेशीर घटकही आहेत. 

* मटकीची पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
 

१) १ वाटी मटकीचं पीठ 

२) अर्धी वाटी बेसन 

३) सैंधव मीठ चवीनुसार 

४) पाव चमचा जिरे 

५) अर्धा चमचा लसूण पेस्ट 

६) अर्धा चमचा हळद 

७) पाणी. 

* मटकीची पुरी बनवण्याची कृती :-

 

सर्वप्रथम वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावं त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून माऊ मळून घ्या. आता तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्या. आता कढईत तेल गरम करून त्यात पुऱ्या तळून घ्या. 

        या तयार पुऱ्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. किंवा तिखट सॉस, शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता. 

No comments:

Post a Comment