साहित्य :
- १ वाटी रवा
- ३/४ वाटी साखर
- १ वाटी आंब्याचा रस किंवा गर
- ३ चमचे साजूक तूप
- चिमुटभर मीठ
- १/२ चमचे वेलची पूड
- सुकामेवा
- १ वाटी पाणी
कृती :
- सर्व साहित्य एकत्र ठेवावे. रवा चाळून घ्यावा. गॅॅसवर एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र उकळण्यासाठी ठेवावे.
- आता गॅॅसवर एका कढईत तूप टाकून, त्यात रवा टाकावा. दोन मिनिटे भाजल्यावर त्यातच सुकामेवा काप घालावेत.
- छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावे.
- आता रवा छान भाजल्या गेल्यावर त्यात गरम केलेले साखरेचे पाणी टाकावे.
- त्याचप्रमाणे आंब्याचा रस ही टाकावा.
- चांगले मिक्स करून त्याला आळू द्यावे सतत परतत राहावे. म्हणजे बुडाला लागणार नाही आता गॅॅस बंद करावा.
- अशा प्रकारे आंब्याचा शिरा तयार होईल.
No comments:
Post a Comment