साहित्य :
- ४-५ बटाटे उकडलेले
- ४-५ हिरव्या मिरच्या
- ८-१० लसूण पाकळ्या
- १ आलं
- १०-१२ कडीपत्ता पाने
- २-३ चमचे तेल
- फोडणीसाठी
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जीरे
- १/४ चमचे हिंग
- १ चमचा हळद
- ३ चमचे लिंबू रस
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
- बॅॅटर साठी - २ कप बेसन , १/४ चमचे हळद , १/२ चमचे लाल तिखट, पाणी आवश्यकते नुसार
कृती :
- आलं मिरची लसूण याची पेस्ट करून घ्या.
- आता उकडलेले बटाटे स्मॅॅश करून घ्या.
- आता छोट्या तडका वाल्या कढई मध्ये तेल घालावे
- तडतडले की हिंग, हळद, कडीपत्ता, आलं मिरची लसणाची केलेली भरड फोडणीत घालून छान परतून घ्या.
- आता स्मॅॅश केलेल्या बटाट्यामध्ये फोडणी, मीठ, लिंबू रस आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यावी.
- आता एका बाउल मध्ये बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा घालून लागेल तसे पाणी घालून क्रिमी बॅॅटर करून घ्या.
- आता कढई मध्ये तळण्यासाठी तेल घेऊन गरम करायला ठेवा. आणि पाव मध्ये कट करून त्यात बटाट्याचे मिश्रण भरून पाव बंद करून घ्या.
- अशाच प्रकारे सगळे पाव भरून घ्या.
- आता भरून घेतलेले पाव बेसनच्या बॅॅटरमध्ये छानपैकी घोळवून कढईत हळुवार पणे सोडा. आणि दोन्ही बाजूने छान तळून घ्या.
- अशा प्रकारे आपला पाव वडा तयार होईल.

No comments:
Post a Comment