Wednesday, May 17, 2023

वरीची मिठाई


 



वरीची मिठाई बनवण्यासाठी साहित्य :- 

  • १ वाटी वरी तांदळाचे पीठ 
  • अर्धी वाटी दुधाची घट्ट साय 
  • पाव वाटी फणसाच्या गराची पेस्ट 
  • एक वाटी साखर 
  • अर्धा चमचा वेलची पूड 
  • तेल तळण्यासाठी 
  • चिमुटभर मीठ 
  • पाणी ( साखरेच्या पाकसाठी ) 
कृती :- 

  • साखरेचा थोडा पातळ पाक करून घ्या. 
  • साय घ्या. 
  • त्यात वेलची पूड, फणसाचा गर, मीठ व सायमध्ये बसेल इतके वारीचे पीठ घाला.
     
  • पीठ, हाताला तेल लावून मळून घ्या. 
  • आता तेल तापत ठेवा व या मिश्रणाचे चपटे गोळे करून मंद गॅसवर तळून घ्या. 
  • गोळे तेलातून काढून पाकात घालून छान मुरु द्या. 
  • फणसाचे गार्निश करून सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment