Monday, May 15, 2023

वांग्याचे कोरडे भरीत



साहित्य : 

  • ३ मोठी कोवळी वांगी 
  • २ कांदे 
  • १ चमचा आमटीचा मसाला 
  • २ चमचे मीठ 
  • १ चमचा साखर 
  • ३ चमचे ओले खोबरे 
  • २ चमचे कोथिंबीर 
  • अर्धा चमचा तेल 


कृती : 

  • वांगी धुवून पुसावी. अर्धा चमचा तेलाचा पुसट हात वांग्यावरून फिरवावा व नंतर भाजावी. 
  • भाजल्यानंतर ताटलीत ठेवून पातेले उघडे घालावे.थंड झाल्यावर साल व देठ काढावी. 
  • गर हाताने किंवा जेवणाच्या काट्याने कुस्करावा. 
  • कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे. 
  • पोळीभाकरी बरोबर छान लागते. 
  • अशा प्रकारे वांग्याचे कोरडे भरीत तयार होईल.  

No comments:

Post a Comment