Saturday, May 20, 2023

चेरीचे सरबत


 



चेरीचे सरबत बनवण्यासाठी साहित्य पुढीलप्रमाणे :- 

  • १ वाटी बी काढलेल्या चेरी 
  • एका लिंबाचा रस 
  • ४ मोठे चमचे साखर 
  • अर्धा छोटा चमचा मीठ 
  • २ ग्लास थंड पाणी 
कृती :- 

  • चेरी मिक्सरमध्ये घालून २ मिनिटे घुसळावे. 
  • चेरीची पेस्ट झाल्यावर, त्यात लिंबाचा रस, मीठ, साखर आणि अर्धी वाटी घालून १ मिनिटे फिरवावे.
     
  • आता हे मिश्रण गळून घ्यावे. 
  • उरलेले थंड पाणी घालून सरबत प्यायला द्यावे. 

No comments:

Post a Comment