Tuesday, May 16, 2023

टोमॅॅटोची झटपट भाजी




साहित्य : 

  • मोठे लालभडक टोमॅॅटो तीन-चार 
  • कांदे दोन मध्यम आकाराचे 
  • तीन-चार हिरव्या मिरच्या 
  • पाव वाटी कोथिंबीर 
  • तीन चमचे तेल 
  • तिखट एक चमचा 
  • चवीपुरत मीठ व साखर 
  • फोडणीचे साहित्य 


कृती : 

  • टोमाटो, कांदे चिरून. मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. कोथिंबीर चिरून घ्यावी. 
  • फोडणी करून त्यात कांदा परतावा. 
  • कांदा गुलाबी झाल्यावर टोमाटोच्या फोडी, मिरच्या व कोथिंबीर घालावी. 
  • मीठ, तिखट , साखर घालून तीन-चार मिनिटे शिजवावी. 
  • ही भाजी ब्रेडवर पसरून खायला चांगली लागते. मधल्या वेळच्या खाण्यासाठीही चांगली आहे. 
  • कांदा-लसूण मसालाही यात टाकल्यास छान लागतो. 
  • अशा प्रकारे टोमॅॅटो ची भाजी तयार होईल. 

No comments:

Post a Comment