Tuesday, May 2, 2023

कालवंं फ्राय


 
साहित्य : 

  • २० कालवंं 
  • १ चमचा आलं लसूण पेस्ट 
  • १ चमचा लाल तिखट 
  • १/४ चमचा हळद 
  • १ चमचा लिंबाचा रस 
  • मीठ चवीनुसार 
  • १ चमचा कोथिंबीर 
  • २ चमचे तेल 
  • २ चमचे तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा 

कृती : 

  • प्रथम कालवा नीट साफ करून घ्यावी त्यातील वाळू किंवा कच काढून स्वच्छ धुवून घ्यावीत. 
  • नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हळद, मिरची पावडर, मीठ घालून १५ मिनिटे झाकून ठेवावे. 
  • त्यामध्ये थोडे तेल टाकून घ्यावे. 
  • तांदळाचे पीठ अथवा बारीक रव्या मध्ये कालवाची मासं घोळवून गरम तव्यावर फ्राय करण्यासाठी टाकावीत. 
  • दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर फ्राय करावी. 
  • वरून कोथिंबीर टाकून गरमागरम अशी कालवंं फ्राय तयार होईल. 

No comments:

Post a Comment