Saturday, May 13, 2023

आमंड मारिया केक


 

आज आपण अनोखा असा आमंड मारिया केक बनवणार आहोत. चला तर मग बघूया या केकची रेसिपी. 

साहित्य:- 

  • १०० ग्राम बदाम ( काप केलेले ) 
  • १२५ ग्रॅम लोणी ( वितळलेले ) 
  • १/४ चमचा बेकिंग सोडा 
  • २७५ ग्रॅम मैदा 
  • ३५ मिली पाणी 
  • १ मोठा चमचा क्रीम 
  • २७५ ग्रॅम साखर 
  • १ चमचा बेकिंग पावडर
     
कृती :- 

  • साखर व पाण्याला एका सॉस पॅनमध्ये घालावे. 
  • मंद आचेवर तीन तारी पाक तयार करावा. पाकात लोणी घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे. 
  • मैदा, बेकिंग पावडर व सोड्याला चालून पाकमध्ये घालून एकजीव करावे. क्रीमसुद्धा फेटून त्यात घालावे.
     
  • आता बदाम घालून तूप लागलेल्या केक पॉटमध्ये घालून १८० डिग्री सेंटीग्रॅॅडवर ३० मिनिट बेक करावे. 
  • थंड झाल्यावर वरून क्रिमने सजवून सर्व्ह करावे. 

No comments:

Post a Comment