Saturday, May 13, 2023

माखनी डाळ


 


माखनी डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य : 

  • अर्धा कप उडीद डाळ 
  • अर्धा कप राजमा 
  • पाव कप चणाडाळ 
  • एक टोमेटो चिरलेला 
  • एक कांदा चिरलेला 
  • दोन टीस्पून लोणी 
  • अर्धा टीस्पून गरम मसाला 
  • चवीपुरते लाल तिखट 
  • मीठ
     
कृती :- 

  • सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमेटो, मीठ, लाल तिखट, घालून कुकरला शिजवून घ्यावी.
     
  • कढईत लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यात टोमेटोची पेस्ट घालून पुन्हा परता म्हणजे त्यातील तेल वेगळे होईल. 
  • त्यात हिंग आणि गरम मसाला घालून मिनिटभर परतावेत. शिजलेल्या डाळी घालून पुन्हा थोडा मंद आचेवर ठेवावा. वाढण्यापूर्वी वरून बटर घालावे, आणि सर्व्ह करावे. 

No comments:

Post a Comment