Wednesday, May 3, 2023

वांग्याची काप भाजी


 

आज आपण वांगीपासून काप कशी बनवता येतील ते पाहूया. चला तर मग जाणून घेऊया याचे साहित्य आणि कृती.
 

साहित्य :- 

  • लांबट निमुळती वांगी 
  • आलं लसूण 
  • हिरवी मिरची 
  • धने-जिरे पूड 
  • हिंग हळद 
  • मीठ 
  • तेल 
कृती :-
 

  • आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्या. 
  • त्यातच धने-जिरे पूड, हळद, हिंग आणि मीठ घालून एकत्र कालवून घ्या. 
  • वांग्याचे पातळ काप करून घ्या. त्यांना सुरीच्या टोकाने थोडे टोचे द्या. 
  • एकत्र केलेले मिश्रण प्रत्येक कापावर थोडेथोडे घालून हाताच्या अंगठ्याने थोडे दाबून पसरव. जेणेकरून ते आत जाईल. 
  • पसरत भांड्यात / तव्यावर थोडेसे तेल तापवून ते नीट पसरवून घ्या. 
  • एकावर एक येणार नाहीत अशा पद्धतीने सगळे काप भांड्यात / तव्यावर शिजायला ठेवा. 
  • झाकण ठेवून एक वाफ दयेऊ द्या. 
  • काप उलटून पुन्हा एक वाफ येवू द्या. 
  • कुरकुरीत हवे असतील तर आच कमी करून झाकण न ठेवता अजून थोडावेळ गॅसवरच ठेवा. 

No comments:

Post a Comment