Thursday, May 4, 2023

मुग डाळीचा हलवा


 

आपण आज मुग डाळीचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
 

साहित्य :-

  • १ वाटी मुगडाळ 
  • १/२ कप खवा 
  • ३/४ कप गरम दुध 
  • ३/४ - १ कप गरम पाणी 
  • ३/४ वाटी साजूक तूप 
  • ३/४ वाटी साखर 
  • १/२ टीस्पून वेलची पूड 
  • ५-६ बदाम 
कृती :-
 

  • मुगडाळ मंद आचेवर गुलाबी-लालसर रंग येईपर्यंत भाजावी. डाळ एकसारखी भाजली गेली पाहिजे. 
  • डाळ कोमट झाली की मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी. 
  • खवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. 
  • आता कढईत तूप गरम करून भरडलेली मुगडाळ त्यात परतून घ्यावी. केशरी रंग येईपर्यंत परतावे. 
  • नंतर गरम दुध थोडे थोडे घालून परतावे व मंद आचेवर वाफ काढावी. 
  • नंतर गरम पाण्याचा हबका मरून परतत राहावे. डाळीचा रवा पूर्ण शिजेपर्यंत वाफ काढावी. 
  • डाळीचा रवा फुलून आला की त्यात खवा, साखर आणि वेलचीपूड घालावी. सर्व नीट मिक्स करून एक वाफ काढावी.
  • गरमागरम हलवा बदामाचे काप किंवा किस घालून सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment