साहित्य :-
- अर्धा किलो दुधी (कोवळा पाहून घ्यावा, जून असेल तर शिजायला वेळ लागतो आणि खूप बिया असतात.)
- एम मध्यम मोठा बटाटा (भाजी जरा मिळून येण्या करिता)
- तिखटपणानुसार हिरवी मिरची ( कमी घेतली तरी चालेल पण वगळू नका )
- कढिलिंबाची १०/१२ ताजी हिरवीगार पाने
- आवडत असेल तर थोडं लाल तिखट
- मोहोरी आणि जिरं पाव-पाव चमचा
- मीठ
- हळद
- थोडी साखर
- एम-टी-आर ची सांबार पावडर (कुठल्याही ब्रेडचा सांबार मसालाही चालेल )
- बारीक चिरलेली कोथिंबीर, वरून घालण्याकरिता.
- दुधी आणि बटाटा सोलून बाईट- साईज च्या चौकोनी फोडी करून घ्यावा.
- तिखटपणानुसार हिरवी मिरची मोडून किंवा बारीक चिरून घ्यावी.
- लोखंडी कढई तापत ठेवावी आणि जरासं तेल घालावं.
- यात क्रमानी मोहोरी ; तडतडली कि जिरं ; ते जरा फुलल कि हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालावी ; यावर हळद घालून चिरलेली भाजी घालावी आणि व्यवस्थित परतून घ्यावं.
- तेल मसाला नीट माखला भाजीला की वर झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.
- नंतर मीठ, साखर आणि वापरणार असाल तर लाल तिखट घालून परतून भाजी पूर्ण शिजवावी.
- सर्वात शेवटी मोठा चमचाभर सांबार पावडर घालून नीट हलवून आच बंद करून टाकावी आणि झाकण घालून भाजी मुरु द्यावी १० मिनिट तरी.
- मस्त लाल रंग आलेली तरीही मधून मधून दुधीच्या हिरव्या फोडी दिसणारी भाजी तयार !
.jpg)
No comments:
Post a Comment