Wednesday, May 17, 2023

बदाम - सुजीचा हलवा


 


साहित्य :- 

  • एक वाटी जाडसर रवा (सुजी) 
  • अर्धी वाटी तूप 
  • एक वाटी दुध 
  • अडीच वाटी साखर 
  • अडीच वाटी बदाम (बदाम ब्लांच करून त्याचे तुकडे करावेत) 
  • दीड चमचे वेलची पूड 
  • केशरच्या काही काड्या. 


कृती :-
  • कढाई तापवून त्यात रवा भाजून घ्यावा. बदाम ब्लांच करून पुसून घ्यावेत. 
  • त्याची सालं काढावीत आणि मिक्सरवर त्याची जाडसर पूड करावी. 
  • कढाईत तूप गरम करून त्यात ही बदामाची पूड लालसर सोनेरी रंगावर परतावी. 
  • त्यात भाजलेला रवा घालून नीट ढवळावा. त्यावर साखर आणि नंतर दूध घालून हे मिश्रण नीट मिसळून एकजीव करावं. 
  • वरती झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यावं. एक-दोन दणदणीत वाफा काढल्यावर त्यात केशर मिसळून हलवा. 
  • थलथलीत होईपर्यंत शिजवावा. वरून वेलचीपूड घालून हलवा नीट एकत्र करावं. खायला देताना वरून थोडं तूप सोडून गरम गरम वाढावा.  


No comments:

Post a Comment