Wednesday, May 3, 2023

स्वादिष्ट भरली भेंडी


साहित्य : 

  • ३/४ कप शेंगदाणे खमंग भाजून 
  • ३/४ कप पांढरे तीळ भाजून 
  • १/४ कप खोबरे कीस भाजून 
  • २ चमचे गोड मसाला 
  • १ चमचा लाल तिखट 
  • १ चमचा जीरे पावडर 
  • १/२ चमचे आमचूर पावडर / लिंबाचा रस 
  • १.५ चमचे मीठ 
  • १ चमचा हळद 
  • २ चमचे गोडेतेल 
  • ६-७ कढीपत्ता पाने 
  • फोडणीसाठी - जिरे, मोहरी, हिंग, हळद 

कृती : 

  • प्रथम भेंडी मोठया भांड्यात भरपूर पाण्यात घालावी. १/२ तास तशीच ठेवावी. अर्ध्या तासाने या पाण्यात स्वच्छ चोळून दुसऱ्या चाळणीत घालावी. व चाळणीतील भेंडी पुन्हा चांगल्या पाण्याने धुवून निथळून घ्यावी. फडक्यावर पसरून कोरडी करावी व स्वच्छ पुसावी. 
  • कोरड्या पुसलेल्या भेंडीला मधोमध चीर पडून, शेंडे व टोके काढावीत. 
  • भेंडीमध्ये जो मसाला भरायचा आहे टो तयार करून घ्यावा. वरील मसाल्याच्या साहित्याप्रमाणे तीळ, दाणे, खोबरे भाजून अर्धवट असे बारीक करावे. 
  • एका ताटात हे काढून घ्यावे. त्यात तिखट, गोडामसाला, जिरेपूड, मीठ , लिंबाचा रस, हळद घालावे. वरून २ चमचे गोडेतेल घालावे. 
  • यामुळे मसाल्याला थोडा ओलसरपणा येतो. सर्व मिश्रण एकजीव करावे. 
  • मधोमध चीर दिलेल्या भेंडीमध्ये मसाला भरपूर आणि दाबून भरावा. आता कढईत तेल तापत ठेवावे. फोडणी करून द्यावी. 
  • फोडणीत भरलेली भेंडी घालून परतावी. लागल्यास तेल घालावे. 
  • पाच मिनिटे परतून झाकण ठेवावे. १० मिनिटांनी झाकण काढावे व पुन्हा भेंडी परतावी. आता झाकण घालू नये. भेंडी हलक्या हाताने परतावी. 
  • भेंडी शिजली का ते चेक करावे, व शिजली असल्यास गॅॅस बंद करावा. भेंडी कढईतून काढावी. वरून कोथिंबीर घालावी. 
  • अशा प्रकारे चविष्ट अशी भरली भेंडी तयार होतील. 

No comments:

Post a Comment